शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

गोदावरीत बुडालेल्या संतोष तांगतोडेचा मृतदेह सापडला

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 26, 2024 6:56 PM

२६ तास चालले शोध कार्य : रेस्क्यू टीमच्या बोटीद्वारे बाहेर काढले

कोपरगाव (जि. अहमदनगर) : विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेलेला कारवाडी-हंडेवाडी येथील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी गोदावरी नदीत बुडाला होता. त्याचा शोध घेण्याचे काम महसूल प्रशासन व ग्रामस्थ करीत होते. २६ तासांच्या शोध कार्यानंतर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल तांगतोडे (वय ३०), प्रदीप तांगतोडे (वय २८) व नारायण तांगतोडे (वय ५२) हे विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेले होते.

संतोष तांगतोडे हा गोदावरीत उतरला. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष बुडाला. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरू राहिले. अंधार पडल्याने ते थांबविले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संतोष तांगतोडेचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, मंडळाधिकारी नानासाहेब जावळे, तलाठी दीपाली विधाते, पोलिस पाटील रामराजे भोसले, पथकामध्ये कालू अप्पा आव्हाड, संजय विधाते, प्रशांत शिंदे, किरण सीनगर, प्रमोद सीनगर, घनशाम कुऱ्हे, आकाश नरोडे, विशाल, कासार, मंगेश औताडे आदींनी शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले आहे.चौकट-शुक्रवारी सकाळीच बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू होते. दुपारी अडीचच्या सुमारास २६ तासानंतर मृतदेह तरंगत आल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी तहसीलदार भोसले यांना कळवताच कोपरगाव नगरपरिषदेच्या रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. बोटीद्वारे संतोषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरdrowningपाण्यात बुडणे