शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
2
तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला
3
या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे
4
अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
5
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
6
"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर
7
Rajesh Power Services IPO : पहिल्याच दिवशी पैसा झाला दुप्पट; 'या' IPO नं केला १००% चा फायदा; कोणता आहे शेअर?
8
'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
9
२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट
10
'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
11
मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
12
आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता
13
९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..
14
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान
15
निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन
16
'या' सरकारी कंपनीनं मुंबईत केली पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; पाहा काय आहेत नवे दर?
17
थंडी पळाली, राज्यात २-३ दिवस पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट...
18
एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
19
एकेकाळी सायकलवरून फिरून नमकीन विकले, आता ५५३९ कोटींची आहे कंपनी; काय आहे व्यवसाय?
20
Fimfare OTT Awards: करीना कपूर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 8:50 AM

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

NCP Nilesh Lanke ( Marathi News ) : "आपले भविष्य उज्ज्वल आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही. भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक व ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत. मात्र, एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एक महिन्याच्या कालावधीतच एक गूड न्यूज कळेल," असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे महाविकास आघाडीच्या चिंतन मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, "एका निवडणुकीने मी खचणारा किंवा हताश होणारा नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यांनी या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून माझ्यावर ट्रॅप लावला," असा आरोप लंके यांनी केला.  तसंच "आपला काठावरचा पराभव निश्चितच चिंतनाचा विषय आहे. प्रतिष्ठानकडून आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारा काळ आपला आहे. आम्ही खचत नाही. यापुढील काळात चुकीची दुरुस्ती करण्यासाठी काम करणार आहोत. आरोग्य, नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करुन सुरुवात करणार आहे," अशी माहितीही लंके यांनी यावेळी दिली.

दरम्यान, "आपल्या कामाच्या जीवावर आपण राज्यात ओळख निर्माण केली. आता हताश न होता. आपल्या चुका दुरुस्त करा. समाजाला दोष देऊ नका. पोस्टलला मताधिक्य असेल तर उमेदवार विजय व्हायचा. परंतु, या विधानसभा निवडणुकीत उलटे झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला. परंतु, पारनेरच्या जनतेसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत," असे निलेश लंके यांनी सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nilesh lankeनिलेश लंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhilyanagarअहिल्यानगरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी