अहमदनगर: जैन समाजाचे तीर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी नगर शहरातून सकल जैन समाजाच्यावतीने काढण्यात आलेली भव्य अहिंसा बाईक रॅली लक्षवेधी ठरली. या रॅलीच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश देण्यात आला.
शहरातील आनंदधाम जवळील तरुणसागरजी उद्यान येथे जैन समाजाच्या ध्वजाचे रोहण करून या अहिंसा बाईक रॅलीस सुरवात झाली. रॅलीत अग्रभागी रथात भगवान महावीर स्वामींची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या रॅलीत सकाळ जैन समाजाचे हजारो बंधू-भानिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. महिलांना खास फेटे बांधण्यात आले होते. जय महावीर..जय आनंद घोषणा यावेळी देण्यात आल्या. रॅलीचा शुभारंभ बडीसाजन ओसवाल संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांच्या हस्ते तरुणसागरजी उद्यान येथे जैन ध्वजारोहण करून करण्यात आला.
यावेळी नगरसेवक विपुल शेटिया, सुवेंद्र गांधी, धनेश कोठारी, सफल जैन, माजी नगरसेवक संजय चोपडा, शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीप सातपुते, सचिन डुंगरवाल, सुदर्शन डुंगरवाल, ईश्वर बोरा, सुमित वर्मा, प्रकाश भागानगरे, महावीर बोरा, कुणाल जैन, अभय श्रीश्रीमाळ, अक्षय सुराणा, सार्थक चोपडा आदींसह मोठ्या संख्यने जैन बंधू-भगिनी भगी झाले होते.