शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:20 AM

भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे.

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील बोरबन (सराटी) परिसरात टेकडवाडी लोक वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.       तालुक्यातील बोरबन (सराटी) टेकडवाडी येथे देविदास गाडेकर,अनिल गाडेकर,नवनाथ गाडेकर,शांताराम गाडेकर,शिवाजी गाडेकर,सोमनाथ गाडेकर, अनंथा गाडेकर आदींसह ग्रामस्थ येथे राहतात. आजूबाजूला डोंगर व  नदीपात्र काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे. आज (बुधवारी ३० ) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला  कळविले आहे. तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. यापूर्वीही दोन वर्षापूर्वी सराटी लोकवस्ती पासून काही अंतरावर असणाऱ्या करवंदवाडी येथील काळदरा ओढ्यातील खडकाला भेगा पडून ओढ्यातील पाणी अचानक आटले होते .याबाबत नाशिकच्या मेरी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी व भूजल संरक्षण विभागाशी संपर्क केला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.  -अमोल निकम , तहसीलदार ,संगमनेर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी