शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

काही लोकांकडून सहकार संपविण्याचे काम - डॉ. सुजय विखे

By शिवाजी पवार | Published: September 26, 2023 4:33 PM

विखे म्हणाले, सध्या विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध असणाऱ्या संस्था बंद कशा पडतील यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) :  जिल्ह्यात सध्या काही मंडळी सहकार संपविण्यासाठी काम करत आहेत. मात्र यातून सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकरी संपला जातोय, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे यांनी केली. श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखे बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शरावसाहेब खेडकर, कार्यकारी संचालक डी. पी.पाटील हे होते.

विखे म्हणाले, सध्या विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध असणाऱ्या संस्था बंद कशा पडतील यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु ते हे विसरत आहे की आमच्या कुटुंबीयांनी त्या जिवंत ठेवल्या. त्यामुळे संस्थेशी निगडित कामगार, मजूर, शेतकरी आणि त्यावर आधारित त्यांचा संसार हा चालला. मात्र या लोकांनी आम्हाला विरोध करण्यासाठी या सर्वांच्या संसारावर पाणी फेरले. केवळ विरोधासाठी राजकारण करून सहकारी संस्था बंद पडण्याचा जो उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत त्यामुळे शेतकरी, कामगार, मजूर आणि त्यांचे कुटुंबीय हे उघड्यावर येत आहेत. ते जे हे पाप करत आहेत त्याची परतफेड त्यांना करावीच लागणार असून हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

मुळा प्रवरा वीज संस्थेचे काम अत्यंत चांगले चालविण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यावरही प्रशासक आणले. यामुळे माझे काय नुकसान झाले नाही. परंतु संस्थेवर आधारित कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून न्यायालयात संस्थेचे मतदान कमी करण्यासाठी अनेकजण पुढे आले. मात्र ही संस्था व्यवस्थित चालवून शेतकऱ्यांना , कामगारांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही संस्था पुन्हा कशी उभारेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे खासदार विखे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखे