घरफोडी करून दागिने चोरले
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील बेलापूर येथे चोरट्यांनी घरफोडी करून मोबाइल, दागिन्यांसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ११ ते १२ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात रेवननाथ सोमनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक यादव हे पुढील तपास करत आहेत.
महिलेचे गंठण चोरले
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे गंठण चोरून नेले. ८ ते १२ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात सुवर्णा स्वप्नील रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल रघुनाथ पिंपळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल पंधरकर हे पुढील तपास करत आहेत.
मोटारसायकल चोरली
अहमदनगर : केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेजवळून चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली. ९ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रसाद शरद पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पंचमुखी हे पुढील तपास करत आहेत.