तिसगाव : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना कोल्हापूर, कोकण, सातारा जिल्ह्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने मदत जाहीर करावी. तसेच या मदतीचे तातडीने प्रत्यक्ष वितरण सुरू करावे. अन्यथा लोकप्रतिनिधी या नात्याने सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे.
ऑगस्ट अखेरीला व सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतातील खरिपाची हातातोंडाशी आलेली पिके, राहती घरे वाहून गेली. विजेचे खांब, दळवळणासाठीचे वाडीवस्तीतील रस्ते, सेतूपुलांची हानी झाली. विविध पाळीव पशुंसह मानवी जीवितहानीही झाली. याबाबत थेट वाडीवस्तीवर जाऊन पाहणी पाहणी केली. प्रशासनानेही पंचनामे करून अहवाल दिला आहे. याबाबत नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची व मंत्रालय स्तरावरील विविध अधिकाऱ्यांना येथील पूरस्थितीची माहिती दिली. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचे राजळे यांनी सांगितले.
---
ते निकष शेवगाव-पाथर्डीला काही नाहीत
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व विभागीय आयुक्तांनी तत्काळ तत्कालिन मदत व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. तो शासन निर्णय होऊन मदतकार्य सुरू झाले. तेच निकष शेवगाव-पाथर्डीला का नाहीत. येथे दुजाभाव का, असा प्रश्न आमदार मोनिका राजळे यांनी केला आहे.