श्रीगोंदा : ओबीसी व मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील निष्क्रिय सरकार अपयशी ठरले आहे. दोन्ही घटकांना पूर्ववत आंदोलन न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.
ओबीसी समाजाला राजकीय, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी श्रीगोंदा येथे भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पाचपुते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, असा आदेश दिला. मात्र या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप पाचपुते यांनी केला.
यावेळी दिनकर पंधरकर, पोपटराव खेतमाळीस, दादाराम ढवाण, भैया लगड, शहाजी हिरवे, बाळासाहेब महाडिक, संतोष रायकर, संदीप नागवडे, राजेंद्र उकांडे, रमेश लाढाणे, बापू गोरे, अशोक खेंडके, उमेश बोरुडे, दीपक शिंदे, विक्रम भोसले, सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, अंबादास औटी, दीपक शिंदे, नितीन नलगे, दत्ता जगताप आदी उपस्थित होते.
---
२६ श्रीगोंदा बीजेपी
श्रीगोंदा येथील आंदोलनप्रसंगी तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देताना आमदार बबनराव पाचपुते व इतर.