अहमदनगर : कोरोना लसीकरणाचा वेग आरोग्य यंत्रणेने वाढवला असून, आता जिल्ह्यात ४८ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ७० हजार डोस प्राप्त झाले असून १४ फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करायचा आहे.
नगर जिल्ह्यातील ३२ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्याचे नियोजन करण्यात आले. नगरमध्ये १६ जानेवारीला लसीकरणास प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात ३९ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात ३१ हजार लसीचे डोस आरोग्य यंत्रणाला प्राप्त झाले. प्रारंभी १२ केंद्रांवरच लसीकरणास प्रारंभ झाला. नंतर केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. परंतु लस घेण्यासाठी आरोग्य विभागाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता महसूल व पोलिसांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत ३१ हजार डोस देण्याचे उद्दिष्ट समोर असल्याने आरोग्य यंत्रणेने आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ४८ केली आहे. प्रत्येक केंद्रावर रोज १०० जणांना लस दिली जाणार आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना दुसरा डोस १४ फेब्रुवारीनंतर देण्यात येणार आहे.
------------
तालुकानिहाय लसीकरण केंद्रनगर -४, अकोले- ५, जामखेड - १, कोपरगाव ३, कर्जत- ३, नेवासा ३, संगमनेर ३, पारनेर ४, पाथर्डी ३, शेवगाव २, राहुरी ३, राहाता ८, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर ३.