लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : सध्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आठवड्याला जास्तीत जास्त अठरा विमानांचे उड्डाण होत आहे. लॉकडाऊननंतर या विमानतळावरून जवळपास ६५ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतल्याचे विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी सांगितले.
देशातील सर्वात वेगाने वाढणारे व उत्तम प्रतिसाद मिळत असलेले विमानतळ म्हणून साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. यामुळेच येथे विमान उड्डाणाची योजना लागू करण्यात आलेली नाही. सध्या आठवड्यातील तीन दिवसात सात विमाने, दोन दिवस पाच तर दोन दिवसात सहा विमाने ये-जा करत आहेत. डिसेंबर व जानेवारीत सरासरी वीस हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. फेब्रुवारीत यात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
शिर्डीतून हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद, अहमदाबाद व इंदोर येथे विमानसेवा सुरू आहे. केवळ एअर इंडियाची मुंबई ते शिर्डी सेवा बंद आहे. एप्रिलमध्ये मुंबईसाठी गो-एअर किंवा इंडिगो नवीन सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
...
नाईट लॅडिंगसाठी पायाभूत सुविधा उभारणी
शिर्डी येथील विमानतळावरून नाईट लॅडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर विमानांची वर्दळ वाढणार आहे. नाईट लॅडिंगसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची व पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे. मार्चअखेर डीजीसीए प्रत्यक्ष पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तत्काळ नाईट लॅडिंग सुरू होऊ शकेल, असे दीपक शास्त्री यांनी सांगितले.
...