शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

३ महिने झालं पाऊस नाही, पेरण्याही गेल्या; अण्णा हजारेंची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:15 IST

जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या.

मुंबई/अहमदनगर - राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे  येणाऱ्या काळात दुष्काळाचे संकट घोगावू लागले आहे. जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला असून ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसानेदेखील दोन दिवसांपासून काढता पाय घेतला आहे. गेल्या ५ दिवसांत थोडाच व काही ठिकाणीच पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. सोयाबिन, तूर, ज्वारीसह फळबागाही पाण्याअभावी जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे, शासनाने दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे.   

जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या. त्यामुळे, सरकारने तुमचा पक्ष आणि पार्ट्या काय करायचंय ते करावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच, हे मानवतेला धरुन योग्य असल्याचंही अण्णांनी म्हटलं. सरकार आणि विरोधकांनी बसून विचार केला पाहिजे, दोघांनी समन्वयाने शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही अण्णांनी मीडियाशी बोलताना म्हटले. 

राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलोऱ्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, सोयाबीनच्या उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीनची राज्यात सर्वात जास्त क्षेत्रावर लागवड झाली असून, भात पिकालाही पावसाच्या खंडाचा फटाका बसला आहे. भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनात ही घट किमान १५ ते २० टक्के व कापूस पिकात किमान ५ ते १० टक्के घट येऊ शकते.

जूनपासून किती पाऊस?

मराठवाड्यात जून महिन्यापासून आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. २२२ मि.मी.पावसाची तूट असून पावसाळा संपण्यासाठी १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.

खरिपाची पीके धोक्यात

कृषी विभागाने केलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक ६७ टक्के घट खरीप ज्वारी, तर ६६ टक्के घट बाजरी पिकात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मक्याच्या उत्पादनात ४१ टक्के घटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुगाचे उत्पादन ६६ टक्क्यांनी, तर उडीद पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. मात्र, भात पिकात १३ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी - कृषीमंत्री मुंडे

राज्यातील बहुतांश भागात व विशेषकरून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती