मिसाळ म्हणाल्या, कोविड वाॅर्डमध्ये काम करायचे म्हटले तर कोणत्याही प्रकारची भीती बाळगून चालणार नाही. कारण जराशी मनात शंका उत्पन्न झाली तर काम करता येणार नाही. एकीकडे रुग्ण सेवा तर दुसरीकडे पती, मुले, सासू व सासरे यांचीही जबाबदारी. रुग्ण व कुटुंब दोन्हीही सुरक्षित ठेवण्याचे काम सांभाळावे लागते. अशा वेळी स्वत:ला सतत सकारात्मक मनोवृत्तीत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. अन्यथा कामातून पळ काढावा लागेल.
रुग्णांना केवळ औषधाने गुण येत नाही. त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना जागविण्याचे कामही आम्हाला करावे लागते. कारण रुग्ण कौटुंबिक वातावरणापासून तुटलेला असतो. त्याच्या मनामध्ये भीतीचे वातावरण असते. त्याला आधार देण्याची गरज असते, असे मिसाळ म्हणाल्या.
रुग्णालयात वासंती देशमुख, विजया जमधडे, कामिनी डापसे, अनिता जावळे, सुनीता जगताप, मनीषा आरू, मालती खरात, विद्या आल्हाट, ललिता हाडोळे, स्वाती लोखंडे, कोमल त्रिभुवन, छाया राऊत, सोनम राऊत, संध्या थोरात, माधुरी पाटोळे या काम पाहत आहेत.
---------
पीपीई किट वापर अशक्य
कोविड वाॅर्डामध्ये २४ तास पीपीई किट परिधान करून सेवा देता येत नाही. तीव्र तापमानामध्ये किटमध्ये काम करणे शक्य नाही. इतर आवश्यक सुरक्षेचे नियमांचे मात्र पालन करतो, असे मिसाळ यांनी सांगितले.
----------
कुटुंबाची काळजी
रुग्णालयातून घरी आल्यानंतर लहान मुले पळत येतात. अशावेळी काळजी वाटते. त्याचबरोबर घरातील सर्व कामांतूनही उसंत मिळत नाही. हा सर्व काळ कठीण आहे, असे परिचारिकांनी सांगितले.
---------