अहमदनगर : न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. न्यायालयीन प्रक्रियेत काही कारणास्तव खटले प्रलंबित राहतात. पक्षकारांना लवकर न्याय मिळत नाही. त्यामुळे वेळेचे बंधन घालून देणे गरजेचे आहे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. निकम यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाºयांशी संवाद साधला. ते म्हणाले, बहुतांशी वेळा फौजदारी खटल्यांचा लवकर निकाल लागतो. दिवाणी खटल्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो.कोपर्डी खटल्याच्या निमित्ताने जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे ध्वनीमुद्रण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
न्यायदानात वेळेचे बंधन असावे, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचं मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:41 AM