अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ६९५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ७३१ने वाढ झाली. सध्या ४ हजार ८२६ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२७ आणि अँटिजेन चाचणीत २३७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (१८८), पाथर्डी (६२), श्रीगोंदा (६२), पारनेर (६०), नगर ग्रामीण (५८), कर्जत (४९), राहाता (३७), शेवगाव (३५), राहुरी (३१), नगर शहर (३१), कोपरगाव (२९), श्रीरामपूर (२८), अकोले (२२), जामखेड (१३), इतर जिल्हा १३), नेवासा (११) येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही ३ लाख ४२ हजार ३५१ इतकी झाली असून ६ हजार ७८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ८२६ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.