अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे़ नावीन्यपूर्ण योजनेतून विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधी तुटपुंजा असल्याने केवळ दोनशे शाळांतीलच खांब या निधीतून स्थलांतरित होणार असून, उर्वरित चारशे शाळांतील खांब व तारा जैसे थे राहणार आहेत़ त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या संरक्षण भिंतीच्या आत, शाळेच्या कोपऱ्यात, तर काही ठिकाणी खेळाच्या मैदानात विद्युत खांब व तारा आहेत़ गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न जिल्हा परिषदेत गाजतो आहे़ जिल्हा परिषदेने विद्युत खांब स्थलांतरित करण्यासाठी लागणारा निधी देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती़ चालूवर्षी नावीन्यपूर्ण योजनेतून विद्युत खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणला ८० लाख रुपये नुकतेच मंजूर करण्यात आले आहे़ जिल्हा परिषदेच्या ६१८ शाळांच्या परिसरात विद्युत खांब व तारा येतात़ त्या सर्व स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे़ मात्र पालकमंत्र्यांनी अपुरा निधी दिल्यामुळे जिल्हा परिषदेचा भ्रमनिरास झाला असून, हे पोल हटवायचे कसे असा प्रश्न शिक्षण समितीसमोर आहे,कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांतील शाळांच्या प्रांगणात खांब व तारा येतात़ दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना याकडे दुर्लक्ष होत आहे़ शासन एकप्रकारे अशा दुर्घटना घडण्याची वाट बघते कि काय, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे़ शाळेतील शिक्षकांनी यासंदर्भात गावच्या कारभाºयांकडे तक्रारी केल्या़ पण, ग्रामपंचायतींकडून ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही़ शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे वर्ग केला जात आहे़ या निधीतून गावातील प्रमुख समस्या सोडविणे ग्रामपंचायतींना शक्य आहे़ पण, शाळांकडे दुर्लक्षच होत असल्याचे यावरून दिसते.जामखेड- कर्जतमधील पोल निघालेजिल्ह्यातील कर्जत व जामखेडमधील शाळांच्या परिसरात असलेले खांब महावितरणने स्थलांतरित केले़ पण अन्य तालुक्यांतील शाळांतील खांब जैसे थे असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
विद्युत खांब असलेल्या तालुकानिहाय शाळानगर.............................. ४०नेवासा........................... ३०पारनेर........................... ३७पाथर्डी.......................... ४७राहुरी............................ ४०अकोले.......................... ३कोपरगाव...................... २६संगमनेर........................ ४६कर्जत........................... ६६शेवगाव......................... २८राहाता.......................... १७जामखेड....................... ३३श्रीगोंदा........................ ५८श्रीरामपूर...................... २१