शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

विधानसभेसाठी येणार ७ हजार मतदान यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:52 PM

जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून जिल्ह्यात तब्बल सात हजार मतदानयंत्रांची गरज भासणार आहे.

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून जिल्ह्यात तब्बल सात हजार मतदानयंत्रांची गरज भासणार आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेची यंत्रे न वापरता तमिळनाडू येथून बेल कंपनीची नवी यंत्रे मागवण्यात येणार आहेत. ३१ जुलैपर्यंत ही यंत्रे जिल्ह्यात दाखल होणार असून १५ आॅगस्टपूर्वी या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात येणार आहे.येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी भारत निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी करून ते निश्चित करणे, स्वीप समितीच्या बैठका आदी कार्यक्रम सुरू आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७२२ मतदान केंंद्र असून त्या ठिकाणी निवडणूक शाखेकडून मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ७ हजार मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) ५ हजार २३० कंट्रोल युनिट व ५ हजार ४५० व्हीव्हीपॅट मागवण्यात आले आहेत. तामिळनाडूतून येणारे हे सर्व मशीन नवे कोरे असून त्यांचा लोकसभा निवडणुकीत वापर झालेला आहे. ३१ जुलैपर्यंत ही यंत्रे जिल्ह्यात दाखल होणार असून १५ आॅगस्टपूर्वी या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात येणार आहे.मतदारयादी पुन:रीक्षण कार्यक्रमानुसार विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू असून त्यात नवीन मतदारांची नोंदणी, नावात बदल, मयत, दुबार नावे वगळणे ही कामे होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर बीएलओंमार्फत ही मोहीम सुरू असून मतदारांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.लोकसभेची मतदान यंत्रे गोडावूनमध्येचशिर्डी व नगर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जी मतदार यंत्रे वापरली, ती यंत्रे या विधानसभा निवडणुकीत वापरली जाणार नाहीत. ती अद्याप एमआयडीसीमध्ये वखार महामंडळाच्या गोडावूनमध्येच सील आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर