अहमदनगर : चुकीच्या पद्धतीने कारवाई करून बडतर्फ केल्याने आपणावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे इतर चालकांप्रमाणे आपणासही सेवेत घ्यावे, अन्यथा कुटुंबासह आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी बडतर्फ एसटी चालक शरद पोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महामंडळाने २०१३ मध्ये अयोग्य व बेकायदेशीरपणे नोकरीतून बडतर्फ केले. त्याच गैरवर्तनाबाबत इतर ९२३४ वाहकांना वेतनवाढ थांबवून नोकरीत कायम ठेवले.एकाच प्रकरणात सारख्याच शिक्षा द्याव्यात असे शासनाच्या परिपत्रकात नमूद असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी भेदभाव करून आपणास बडतर्फ केले. महामंडळाकडे आपण वेळोवेळी लेखी मागणी करून न्याय मागितला. मात्र अद्याप दखल घेतली गेली नाही, असे पोटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली इच्छामरणाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 4:46 AM