शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

कोपरगावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:32 PM

शहरातील बाजारतळ परिसरातील सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

कोपरगाव : शहरातील बाजारतळ परिसरातील सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सराफाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कोपरगाव शहरातील बाजारतळ परिसरातील अरविंद शामराव मंडलीक (रा.पवार सरकार वाडा, कोपरगाव) यांच्या मालकीचे ओंकार ज्वेलर्सचे शुक्रवारी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडले. दुकानातील कपाटातील व तिजोरीमधील ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २७० ग्रम सोन्याचे दागिने, ५२ हजार ५०० रुपये किमतीचे दुरुस्तीसाठी आलेले सोन्याचे दागिने ७५ हजार रुपये किमतीची २.५ किलो चांदी तर १० हजार रुपये रोख असा एकूण ८ लाख १२ हजार ५०० मुद्देमाल चोरीस गेला आहे. दुकानचे मालक अरविंद मंडलिक यांनी शनिवारी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली.शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ नगर येथील श्वानपथक व फिंगर प्रिट पथक घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने बसस्थानक रस्त्याच्यामार्गे बागुल टॉवरपर्यंतच माग काढला.याप्रकरणी मंडलिक यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी दिवसभर बंद पाळला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर