शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 1:14 PM

कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह  हॅँड वॉशही चोरून नेले.

शिर्डी : कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह  हॅँड वॉशही चोरून नेले.    नगर-मनमाड मार्गालगत जोशी हॉस्पिटलच्या समोर अशोक जगन्नाथ अहिरे यांचे श्रम साफल्य नावाचे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शटर तोडून या दुकानात चोरी करून जवळपास पाऊण लाखांचा माल लांबवला़ यात प्रत्येकी पंधरा किलो वजनाचे सोळा तेल डबे, वीस किलो तूप, काजू, बदाम, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटस, बिस्कीट व जवळपास पंचवीस हॅँड वॉशचाही समावेश आहे. याशिवाय दुकानाच्या गल्ल्यातील दहा ते पंधरा हजाराची रोकडही चोरीस गेली आहे. चोरट्यांनी हा माल नेण्यासाठी मोठ्या गाडीचा वापर केला असण्याची शक्यता आहे.    सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर अनिश्चीत काळासाठी संचारबंदी असल्याने नागरिक  तुटवड्याच्या भीतीने किराणा माल, धान्य आदींचा साठा करून ठेवत आहेत. त्यातच अनेक गुन्हेगारांच्या हातांनाही सध्या काही काम नसल्याने लहान-मोठ्या चो-या होण्याची शक्यता आहे. पण चोरी करतांना हँड वॉशही नेल्याने सध्याच्या संसर्गात चोरटेही स्वच्छतेचीही काळजी घेत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी माजी नगराध्यक्षा जयश्री थोरात व विष्णू थोरात यांनी केली आहे........

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीShoppingखरेदी