लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह २२ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी शनिवारी दोषी धरले. १७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (दि. ८) शिक्षा सुनावली जाईल.
पतसंस्थेतील १३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हा खटला सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने २८ जणांची साक्ष तपासली. यामध्ये लेखा परीक्षक देवराम मारुती बारस्कर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अपहाराची फिर्याद दिली होती.
१९ हजार ठेवीदारांचे ३७ कोटी रुपये अडकलेलेnगेल्या ११ वर्षांपासून ठेवीदार ठेवी परत मिळण्यासाठी पाठपुरावा करत होते. या पतसंस्थेत १९ हजार ठेवीदारांचे ३७ कोटी रुपये अडकलेले आहेत. यातील शंभरपेक्षा जास्त ठेवीदार मयत झाले आहेत. nकर्जदारांना विनातारण कर्ज वाटप करणे, नियमबाह्य सोने तारण करत हा अपहार करण्यात आला होता, तसेच संचालक मंडळाच्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररीत्या कर्ज वाटप करण्यात आले होते.nसंचालकांनी अपहार करून सदरची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.