शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

यंदा खरिपाच्या क्षेत्रात १५ टक्के वाढ प्रस्तावित, कृषी विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन

By चंद्रकांत शेळके | Published: May 16, 2024 8:19 PM

सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढण्याची शक्यता

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : सध्या कमी-अधिक पडणारा अवकाळी पाऊस व यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात मागील वर्षीपेक्षा १५ टक्के वाढ अपेक्षित असून, ७ लाख हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील, याची खबरदारी घेतली आहे.

जिल्ह्यात १५ जून ते १५ ऑगस्ट हा खरीप हंगाम पेरणीचा कालावधी असून जिल्ह्याच्या भौगोलिक रचना आणि होणाऱ्या पर्जन्यमानानुसार खरीप हंगामातील पिकांची निवड झालेली आहे. यात दक्षिण जिल्ह्यात प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात. तर उत्तरेतील अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशीचे पीक घेण्यात येते. नगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे.

खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, या दोन पिकांमुळे कमी कालावधीत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. याशिवाय भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद या पिकांनाही शेतकरी पसंती देतात.

जिल्ह्यात सरासरी ५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ होत आहे. मागील वर्षी ५ लाख ८६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा त्यात १५ ते १७ टक्के वाढ होऊन ७ लाख २ हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे व खतांचीही आगाऊ मागणी करण्यात आली आहे.दीड लाख टन खत शिल्लकसन २०२४ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एकूण २ लाख ८० हजार टन खताची मागणी शासनाकडे केली. त्यातील २ लाख ३२ हजार आवंटन मंजूर झाले आहे. दरम्यान, यात मागील वर्षीची शिल्लक १ लाख २४ हजार ७२५ टन आहे. १ एप्रिलपर्यंत २० हजार ९०० टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत त्यातून ४ हजार ५२६ टन खतांची विक्री झाली. त्यामुळे सध्या १ लाख ४७ हजार ५७२ टन खते उपलब्ध आहेत. तर उर्वरित खते मागणीनुसार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली.सोयाबीन बियाणाची अधिकची मागणीपेरा वाढणार असल्याने कृषी विभागाने यंदा बियाणांची अधिकची मागणी नोंदवली आहे. यंदा खरिपासाठी ८२ हजार ८४९ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात ४९ हजार ८७५ क्विंटल बियाणे सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल मक्याचे १३ हजार २००, भाताचे ५ हजार ५४०, बाजरीचे २९७५, तर कपाशीचे बियाणे अडीच हजार क्विंटल असेल.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAhmednagarअहमदनगर