शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:57 IST

साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो. 

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटीलबाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण, पद्मश्री विखे व थोरात या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तनपुरे साखर कारखान्याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्याने या कारखान्याची निवडणूकही कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटीलबाळासाहेब थोरात या दोन नेत्यांत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. थोरात यांनी विखे यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे पाटील यांचे पॅनल पराभूत केले. त्यानंतर गत विधानसभा निवडणुकीत विखे पाटील समर्थक अमोल खताळ यांनी थोरात यांना आव्हान देत त्यांना संगमनेर मतदारसंघात पराभवाचा धक्का दिला. विधानसभेनंतर आता थोरात यांचे वर्चस्व असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत विखे व खताळ हे थोरात यांना आव्हान देतील अशी चिन्हे आहेत. विखे यांचे वर्चस्व असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचीही (प्रवरा) निवडणूक जाहीर झाली आहे. गणेशनंतर विखे यांचे विरोधक आता त्यांना प्रवरा कारखान्यातही आव्हान देतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो. 

अवसायनात निघालेल्या डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रियाही लवकरच जाहीर होऊ शकते. कारण या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तनपुरे कारखान्याच्या राजकारणाकडेही विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांचे लक्ष असते. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे समर्थकही मैदानात उतरु शकतात.

'तनपुरे'त विखे-कर्डिले विरुद्ध तनपुरे सामनाडॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असतानाच राजकीय बैठकांनाही वेग आला आहे. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाcongressकाँग्रेस