भाजप हा विचारांचा पक्ष आहे. पक्षाची धोरणे ही देशापासून ते गावपातळीपर्यंत एकच आहेत. या धोरणांपासून लांब गेलेल्या व्यक्तींना पक्षात थारा दिला जात नाही. असाच प्रकार कोपरगाव येथील कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला आहे. अशा कार्यकर्त्यांना यापूर्वीच पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. मात्र तरीही कोपरगावमधील काही असंतुष्ट कार्यकर्त्यांकडून व्यक्तीद्वेषापोटी पक्षाला बदनाम करण्याच्या हेतूने षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप वाणी यांनी केला.
स्नेहलता कोल्हे यांनी गेली पाच वर्षं आमदार म्हणून काम केलेले मोठे आहे. त्या राज्य पातळीवर प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. परंतु ज्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले, पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यात धन्यता मानली, ते पक्षाला बदनाम करत आहेत. विरोधक भाजप कार्यकर्त्यांनी आमदारांचा सत्कार केल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. ते लोक पक्षाशी संबंधित नाहीत, असे वाणी यांनी म्हटले आहे.
---------