नेवासा : पौष वद्य एकादशीनिमित्त सोमवारी श्री क्षेत्र नेवासा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील माउलींच्या पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. पुंडलिक वरदा.. हरि विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करत हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले.
पहाटे पैस खांबास मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. देवटाकळी येथील वारकरी संप्रदायातील सेवेकरी कृष्णा खरड व शांताबाई खरड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
भाविकांचे स्वागत शिवाजी महाराज देशमुख यांनी केले. दिवसभर भाविकांच्या दर्शनाचा ओघ सुरूच होता. दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाच्या दृष्टीने मंदिराचा मुख्य गाभारा बंद ठेवण्यात आला होता. यावेळी मंदिर प्रांगणात गावोगावच्या दिड्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था दर्शन बारीत करण्यात आली होती. यावेळी सातारा येथील अक्षय महाराज भोसले यांचे कीर्तन झाले.
फोटो : ०८ नेवासा पैस
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील पैस खांब.