श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयातील सन २००२ मधील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एकत्र येत ३८ हजारांचा निधी एकत्रित केला आणि हा निधी सुद्रिकेश्वर कोविड सेंटरसाठीमधील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी दिला. या वर्गमित्रांनी रुग्णसेवेसाठी मदतीच्या माध्यमातून दातृत्वाचा धागा गुंफला आहे.
पारगाव सुद्रिक येथील कोविड सेंटरसाठी एकत्र येऊन निधी संकलन करण्याची संकल्पना ज्ञानदेव हिरवे व शरद लबडे यांनी मांडली.
यामध्ये वर्गमित्रांबरोबरच सासरी नांदत असलेल्या प्रमिला बारवकर, अलका बोरुडे, अरुणा आल्हाट, अश्विनी हेमाडे, छाया भोर, प्रतीक्षा जगताप, कार्तिकी आल्हाट, साधना लडकत, अनिता हिरवे यांनीही आपल्या माहेरी सुरू झालेल्या कोविड सेंटरसाठी आपला वाटा उचलला.
हा निधी तालुका कृषी अधिकारी डाॅ. राम जगताप, बापू लडकत यांच्या हस्ते कोविड सेंटरच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आला.
बापू लडकत म्हणाले, आमचा वर्गमित्रांचा ग्रुप संवेदनशील आहे. भविष्यात या कामासाठी आणखी मदत करण्याची आमची तयारी आहे.
--
१२ पारगाव
पारगाव येथील कोविड सेंटरला वर्गमित्रांनी आर्थिक मदत केली.