तालुक्याच्या पठार भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा घेण्यासाठी रविवारी (दि. ३०) साकूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, अशोक हजारे, पांडुरंग सागर, ताराबाई धुळगंड आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भागात मोठी वाढ झाली आहे. याचे कारण ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी झालेले समारंभ आहेत. ही वाढ आपल्याला पूर्णपणे थांबवायची आहे. सध्या संगमनेर तालुक्यातील ५० गावे कोरोनामुक्त असून संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती खेमनर यांनी केले. थोरात साखर कारखान्याचे संचालक खेमनर यांनी आभार मानले.