कर्जत : येथील उपकारागृहातून ९ फेब्रुवारी रोजी पाच आरोपींनी पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. तिस-या दिवशी तीन आरोपींना पकडण्यात कर्जतपोलिसांना यश आले आहे. पाच पैकी तीन आरोपींना पकडण्यात यश आल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. दुसरे दोन आरोपीही लवकरच हाती लागतील असे पोलिसांनी सांगितले. गंगाधर लक्ष्मण जगताप याला कर्जत तालुक्यातील माळंगी येथे पोलिसांनी पकडले. ज्ञानेश्वर कोल्हे व मोहन भोरे यांना पुणे जिल्ह्यातील दौड येथे पकडले आहे. उर्वरित दोन आरोपींना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कर्जत पोलिसांनी ज्ञानेश्वर कोल्हे, गंगाधर जगताप, अक्षय राऊत, मोहन भोरे, चंद्रकांत राऊत या पाच आरोपींना कर्जत येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला एक पोलीस कर्मचारी देखील आहे. या आरोपींवर प्रामुख्याने खून करणे, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार असे आरोप आहेत.
कर्जत उपकारागृहातून पकडलेल्या तीन आरोपींना पकडले; उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:03 PM