जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंगळवारी (दि. २९) याबाबत लोणी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव उपस्थित होते. बेंद्रया ऊर्फ देवेंद्र दुधकाल्या ऊर्फ भारत भोसले, दिलीप विकास भोसले (वय १९), आवेल विकास भोसले (वय २०, तिघेही रा. पढेगाव, ता. कोपरगाव) अशी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. याशिवाय मायकल चव्हाण (वय २१) व डोंगऱ्या चव्हाण (वय १९, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
शनिवारी (दि.२६) रात्री शशिकांत श्रीधर चांगले (वय ६०) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय ५०) या दोघा पती-पत्नीच्या डोक्यात फावडे मारून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राहाता पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा तपास केला असता आरोपींच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भारत भोसले हा आरोपी पोलिसांच्या हातात आला. दरोड्याच्या हेतूने या वृद्ध दाम्पत्याची हत्या आपल्या साथीदारासह केल्याची कबुली त्याने दिली. भारत भोसले हा सराईत गुन्हेगार असून पारनेर, बेलवंडी, कोपरगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
290621\img-20210629-wa0092.jpg
कोर्हाळे येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपीसहराहाता पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचारी