लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितरणकडून नवीन स्वरूपातील वीजबिलाचे वाटप सुरू करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६२६ शेतक-यांकडे १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रकमेची वीजबिले थकीत आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी बिलामध्ये थकीत रकमेचे सुलभ हप्ते, भरावयाची रक्कम व कालावधी देण्यात आला आहे. तसेच योजनेची ठळक वैशिष्ट्य व योजनेत सहभाग घेऊन नियमितपणे हप्ते भरल्यास नेमके किती व्याज व दंड माफ करण्यात येईल, याचीही माहिती बिलात देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे थकबाकी आहे. अहमदनगर मंडलात ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी असणारे १ लाख ९६ हजार ५६२ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे १ हजार ५८ कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ३० हजारपेक्षा कमी रकमेची बिले थकीत असलेले १ लाख ६० हजार ६४ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे २८१ कोटी रुपये थकीत आहेत. ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी शेतक-यांना समान दहा भाग करून देण्यात आले आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत हि रक्कम सामान दहा हप्त्यात भरावी लागणार आहे. ३० हजारपेक्षा कमी थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांना पाच समान हप्ते करून देण्यात आले असून दर तीन महिन्यांनी ते नियमित भरणे अनिवार्य आहे.एकूण थकबाकीदार : ३ लाख ५६ हजार ६२६एकूण मूळ थकबाकी : १ हजार ३३८ कोटी रुपये३० हजारपेक्षा कमी रकमेची थकीत ग्राहक : १ लाख ६० हजार, थकीत रक्कम : २८१ कोटी३० हजारपेक्षा अधिक थकबाकी ग्राहक : १ लाख ९६ हजार ५६२, थकीत रक्कम १ हजार ५८ कोटी रुपये