कोपरगाव : शेतातील हरभरा खुरपणीसाठी जात असताना तुमचा या जमिनीशी काहीही संबंध नाही असे म्हणत आठ जणांनी मिळून तिघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कासली येथे रविवारी (दि.७) घडली आहे. या मारहाणीत ओंकार मलिक, श्रावण मलिक व विठ्ठल मलिक हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी ओंकार विठ्ठल मलिक (वय ३६, रा. कासली ता. कोपरगाव) याच्या फिर्यादीवरुन नानासाहेब काशिनाथ मलिक, दिनेश नानासाहेब मलिक, पवन नानासाहेब मलिक, काशिनाथ किसन मलिक, हिरामण रमेश मलिक, वसंत त्रिंबक भगुरे (सर्व रा. कासली, ता.कोपरगाव ) व वाल्मीक सर्जेराव शिंदे (रा.पढेगाव, ता.कोपरगाव), नानासाहेब मलिक यांचा सासरा नाव माहीत नाही (रा.धामोडे, ता. येवला जि. नाशिक) अशा आठ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के करीत आहेत.