जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरला सुरू झाली. आतापर्यंत अकोले (११), संगमनेर (४), कोपरगाव (१२), श्रीरामपूर (५), राहाता (१), राहुरी (३), नेवासा (१८), नगर (२९), पारनेर (८), पाथर्डी (१३), शेवगाव (२८), कर्जत (१५), जामखेड (१०), श्रीगोंदा (१०) या तालुक्यांत एकूण १६७ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. दि. २३ आणि २४ रोजी अर्ज दाखल करण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. २५, २६, २७ अशी सलग तीन दिवस सुट्टी आली होती. त्यामुळे आज, सोमवारी शासकीय कार्यालये पुन्हा सुरू होत असून, अर्ज दाखल करण्यासाठी आज झुंबड उडण्याची शक्यता आहे.
---
सातवी पासची चर्चा
थेट जनतेमधून सरपंच निवडीची पद्धत रद्द करून आता सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. आता ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सरकारने सातवी पासची अट घातली आहे. याचीच गावपातळीवर चांगलीच चर्चा रंगते आहे. याशिवाय अर्ज दाखल करताना उमेदवाराचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणखी काय काय नियम आहेत, अशा नियमांची माहिती संकलित करण्यासाठी इच्छुकांची सध्या धावपळ सुरू आहे.
--
अशी आहे निवडणूक
ग्रामपंचायत - ७६७
सदस्य - ००००
प्रभाग - ००००
मतदार - ००००
मतदान - १५ जानेवारी