शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

अर्बन बँक अपहरात नगरमधील तिघा डॉक्टरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:15 AM

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ...

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री नगरमधील तिघा डॉक्टरांना अटक केली. न्यायालयाने या तिघांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

२२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी कर्जदार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले, अभिजित नाथा घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत नगर येथील आशुतोष लांडगे याच्यासह इतर आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, लांडगे याच्या खात्यावर अपहारातील तब्बल ११ कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच तिघा डॉक्टरांच्या खात्यावरही पैसे वर्ग झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेतील निरिक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने या तिघा डॉक्टरांना नगरमधून अटक केली. या डॉक्टरांच्या खात्यावर अपहारातील रक्कम का वर्ग झाली, त्यांचा या अपहारात काही सहभाग आहे का, आदींबाबत पुढील चौकशी करणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.

---------------------------------------

बँकेच्याविरोधात डॉक्टरांनी केली होती तक्रार

नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलच्या मशीनरी खरेदीसाठी अर्बन बँकेत परस्पर खाते उघडून आमच्या नावे १८ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे यांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. याबाबत मात्र गुन्हा दाखल न झाल्याने या तिघा डॉक्टरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी बँकेने चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यावर मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. आता अर्बन बँक प्रकरणी दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात या डॉक्टरांना अटक झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.