नानासाहेब जठार.विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील कैद्यांनी कष्ट करून दुग्ध व्यवसायातुन कारागृह प्रशासनाला दिड वर्षात ३ लाख ६९ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.विसापूर कारागृहात शंभर कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांकडुन शेतीसह दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन, इस्त्रीकाम आदि कामे करून घेतली जातात. कारागृहाकडे सध्या १४ गायी, २० बैल, ८ कालवड, ५६ शेळ्या, १० बोकड व ७१ कोंबड्या आहेत. १४ गायींपैकी सहा गायी दुभत्या आहेत. विसापूर कारागृहाची पंचाहत्तर एकर शेती आहे. त्यामधुन ऊस, गहु,भाजीपाला, कडधान्ये पिकवून राज्यातील मुंबई, पुणे व नाशिक कारागृहास पुरवला जातो. शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसायातुन महीन्याला ६८५ लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. एप्रिल २०१७ पासुन दिड वर्षात १२ हजार ३३४ लिटर दुधाचे उत्पादन घेऊन ३४ रुपये लिटर दराने ३ लाख ६९ हजार ४९० रुपयांचे उत्पन्न कारागृहाने मिळवले आहे. कारागृह अधिक्षक दत्तात्रय गावडे व वरिष्ठ तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासुद यांच्या सुचनांप्रमाणे कर्मचारी भारत मल्लाव व तुकाराम निजवे हे कैद्यांकडुन कामे करून घेतात.खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आलेल्या कैद्यांना शासकीय नियमानुसार दररोज शंभर मिली दुध देणे बंधनकारक असल्याने कारागृहाने उत्पादित केलेल्या दुधापैकी प्रत्येक कैद्याला रोज शंभर मिली लिटर दूध प्यायला देण्यात येते. कारागृह कर्मचा-यांना माफक दरात दुधाची विक्री करुन उर्वरित दुध विसापूर येथील शिवामृत दुधसंकलन केंद्राला विकले जाते.कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे स्वत: कृषी पदवीधर असल्याने कारागृहाची शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. शासनाने कारागृहाला कृषी सहाय्यकाची नेमणुक केली नसतानाही गावडेंच्या मुळे त्यांची कमतरता भासत नाही.
कारागृहात दिड वर्षात तीन लाख सत्तर हजाराचे दुग्ध उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:39 PM
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील कैद्यांनी कष्ट करून दुग्ध व्यवसायातुन कारागृह प्रशासनाला दिड वर्षात ३ लाख ६९ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
ठळक मुद्दे विसापूर कैद्यांचे परिश्रमाने राबवले जातात वेगवेगळे शेती पुरक व्यवसाय.