शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

जामखेडमध्ये तीन मोटारसायकल चोरांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:38 PM

जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना ...

जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला. या ग्रामस्थांपैकी एकाने चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् सर्व सूत्रे हालली. ग्रामस्थांनी मोटारसायकलवरील तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी चौकशीत तिघांकडून चार चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर (सौताडा ) येथून तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी एका मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होते. सौताडा घाटातून जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना त्यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. गाडी पडल्यामुळे घाटात त्यांच्या मदतीसाठी काही लोक थांबले. यावेळी जमलेल्या लोकांमधील एकाने आपल्याच गावातील माजी सैनिक बजरंग डोके यांची चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् डोके यांना फोन केला की तुमच्या गाडीचा अपघात झालाय. यावेळी डोके यांनी माझी गाडी दोन दिवसांपूर्वीच चोरीला गेली असून त्या पोरांना धरून ठेवा असे सांगताच त्या जमलेल्या लोकांनी त्या मुलांना धरून ठेवले. यावेळी डोके व पोलीस एकाच वेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलिसी खाक्या दाखवताच मुलांनी अजून चार गाड्या चोरल्याची माहिती दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसJamkhedजामखेड