अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खासगी प्रयोगशाळांना स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे तपासणी जलदगतीने होईल आणि रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करता येतील, या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या खासगी प्रयोगशाळेत नागरिकांचे स्वॅब घेतले जात नाहीत. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित नागरिक थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेतो. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित नागरिकाला जिल्हा रुग्णालयातच ठेवले जाते. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनावरील ताणही वाढला आहे. यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आता खासगी प्रयोगशाळांना स्वॅब घेण्यास मुभा दिली आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, खासगी रुग्णालय, खासगी प्रयोगशाळा (लॅब) यांना कोविड-१९ च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणेकामी व नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांचे, व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणाबाबत निर्देश दिले आहेत. प्रतिबंधात्मक भाग म्हणून प्रयोगशाळांमध्ये जलद चाचणी केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील.
स्वॅब घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाहीच्आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळेत कोविड-१९ तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची आवश्यकता राहणार नाही. संबंधित प्रयोगशाळांना स्वॅब घेतलेल्या व्यक्तींची माहिती, तसेच कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती व अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी यांना रोज कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित माहिती आरटीपीसीआर अॅपवर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लक्षणे असतील तर रुग्णालयात भरतीच्खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड-१९ ची लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी करावयाची असल्यास स्वॅब घेतल्यानंतर त्या रुग्णास रुग्णालयात भरती करणे आवश्यक राहील. लक्षणे नसणाºया व्यक्ती, कोविड-१९ पॉझिटिव्ह सहवासीत व्यक्ती, शस्त्रक्रिया पूर्व व्यक्ती खासगी प्रयोगशाळेत कोविड-१९ तपासणी करावयाची असल्यास संबंधितांना स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नाही. च्मात्र त्यांना अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन आवश्यक राहणार आहे. संबंधित खासगी प्रयोगशाळांनी होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर मारणे बंधनकारक राहील. पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती तातडीने निकटचे शासकीय रुग्णालयांना कळविणे, तसेच त्यांना ‘आयसोलेशन’मध्ये भरती होणे गरजेचे राहणार आहे.