अहमदनगर: नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी मंगळवारपासून दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारुबंदी आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलतना म्हणाले, ‘नगर जिल्हा आॅरेंजमधून रेडझोनमध्ये न्यायला दारु दुकानांतील गर्दी कारणीभूत ठरेल. प्रशासनाला हा निर्णय घेण्याची एवढी घाई का झाली आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तेथील आयुक्तांनी दारुची दुकाने उघडू दिली नाहीत. नगरलाच अशी काय आणीबाणी आली होती? ’राष्टÑ सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनीही या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. ‘कोरोनाला अटकाव करण्यासाठी शाळा, प्रार्थनास्थळे, व्यापार बंद आहे. मात्र, केवळ महसूल मिळतो म्हणून दारु दुकाने सुरु करणे अयोग्य आहे’, असे ते म्हणाले. माहिती अधिकारी कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. तेथे प्रशासन कारवाई करत नाही. एक पूर्ण स्पिरीटच्या टँकर पकडला त्याचाही तपास उत्पादन शुल्क विभाग लावत नाही. उलट दारुची दुकाने सुरु करण्याची प्रचंड घाई केली गेली. हॉटस्पॉट जेथे आहे तेथे लोकांना औषधे देखील मिळत नव्हती. आता दारु मात्र मुबलक मिळणार. हा विरोधाभास आहे. प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे.’ ------------परवानाधारक व्यक्तींनाच दारु उपलब्ध व्हावीकोपरगाव : सरकारने दारू दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी दारू पिण्याचा परवानाधारक व्यक्तींनाच दारू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अॅड. नितीन पोळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दीड महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्यामुळे बºयाच अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. असे असताना दारूची दुकाने सुरू केल्याने अनुचित प्रकार वाढून पोलीस प्रशासनावर ताण पडणार आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक आहे, ते दारू विकत घेतील मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, असे मद्यपी दारू खरेदी करण्याकरिता कोणतेही अनुचित प्रकार करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. एवढे करूनही सरकारला दारू दुकाने सुरू करावी असे वाटत असेल तर ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे. अशा व्यक्तींना आधार लिंक केल्या शिवाय दारू उपलब्ध करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.ं
दारु दुकाने उघडण्याच्या निर्णयावर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 8:28 PM