शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

ऑक्सिजन संपत आल्याने नगर शहरात डॉक्टर हतबल, जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 2:46 PM

अहमदनगर : शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार ? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी खासगी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. 

अहमदनगर : शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार ? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी खासगी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. 

नगर शहरातील खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, तर ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन तर मिळत नाहीतच, पण ऑक्सिजन विक्रेत्यांकडून आता ऑक्सिजनचा पुरवठाही थांबला आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही रुग्णालयात आहे. ऑक्सिजन संपला तर रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार नाही, अशी हतबलता काही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाईकांना बोलून दाखवली.  

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ऑक्सिजनची 50 टनाची गरज असताना फक्त 22 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता तोही ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत.

दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठयाबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे. पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.......जिल्हा रुग्णालयातील ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरमधून नगरमधील काही खासगी रुग्णालयाना ऑक्सिजनचा तात्पुरता पुरवठा करण्यात येत आहे.- संदिप निचित निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या