श्रीरामपूर : नगरपालिकेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांचे अनुदान घेऊनही वैैयक्तिक शौचालये न बांधणाऱ्या ४२३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन त्याचा इतरत्र विनियोग करणाºयांची गय केली जाणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बाबूराव बिक्कड यांनी म्हटले आहे.पालिकेचे कर्मचारी राहुल खलिपे यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासकीय अनुदानाचा गैरवापर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या इतिहासात अशी कारवाई प्रथमच घडली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने वैैयक्तिक शौचालय योजना सन २०१५ पासून राबविण्यात येत आहे. आजअखेर तीन हजार ३१४ लोकांनी अर्ज केले असून त्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला होता.लाभार्थीने तातडीने शौचालयाचे बांधकाम सुरू करणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. ४२३ लाभार्थींनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत बांधकाम केले नाही. सुमारे २५ लाख ३८ हजार रुपयांना फसविल्याचे निदर्शनास आले. अखेर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्याधिकारी डॉ. बिक्कड यांनी सांगितले़
शौचालय अनुदान हडपले; श्रीरामपूरमध्ये ४२३ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 4:08 PM