अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये रविवारी टमाटा आणि कांद्याचे दर घसरले, तर भेंडीचा दर वाढला आहे. गवारचा सर्व भाज्यांत उच्चांक कायम आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत. भेंडीला मात्र मागणी वाढली असून ३२०० रुपये क्विंटल असा ठोक भाव मिळाला आहे. गवारीची आवक सर्वात कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने गवार नऊ हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे. वटाणा, वाल, हिरवी मिरची, लिंबू महागले आहे. गावरान लसुणाला १० हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात त्यामुळे लसणाचे दर १५० ते २०० रुपये किलो इतके झाले आहेत.
रविवारी बाजार समितीत भाजीपाल्याला मिळालेले दर असे होते. ( दर प्रति क्विंटल रुपये)
टमाटा-१०००, वांगी-१०००, फ्लावर-१५००, कोबी- ६००, काकडी-१५००, गवार-९०००, घोसाळे-२५००, दोडका-२५००, कारले-३०००, वटाणा-३०००, भेंडी-३०००, वाल-२५००, बटाटे-१२००, हिरवी मिरची-३०००, शेवगा-३५००, लिंबू-३५००, गाजर-१२००, शिमला मिरची-२०००.
------
पालेभाज्यांचे दर ( रुपये प्रति शंभर गड्डी)
मेथी-५००, कोथंबिर-६००, करडी-५००, शेपू-४००, मुळा-६००, चुका-७००, पालक-५००.
------
डाळिंबाचे भाव वाढले
गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १२ हजार रुपये क्विंटल होते. त्यात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सफरचंदाचा दर मात्र १२ हजार रुपये क्विंटल असून, बाजारात सफरचंदापेक्षा अजूनही डाळिंबालाच जास्त भाव आहे. इतर फळे ( रुपये प्रति क्विंटल) मोसंबी-६५००, संत्रा-६०००, पपई-१३००, राम फळ-४२००, चिकू-१८००, द्राक्षे-४०००, खरबूज-२०००, कलिंगड-७००.
-----