अरुण वाघमोडे
अहमदनगर : लाच स्वीकारल्याप्रकरणी शनिवारी (दि.९) एकाच दिवशी जिल्ह्यातील चार लोकसेवकांविरोधात कारवाई झाल्याने सरकारी कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिने नऊ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करत २७ लोकसेवकांना गजाआड केले आहे. लाचखोरीत नगर जिल्हा नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत प्रथमस्थानी राहिला आहे.
लाच प्रकरणात नेहमीप्रमाणे सर्वाधिक गुन्हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या विरोधात आहेत. त्यानंतर पोलीस प्रशासनाचा नंबर लागतो. लाच स्वीकारल्याचे सर्व गुन्हे वर्ग २ व ३ मध्ये मोडणाºया अधिकारी-कर्मचाºयांच्या विरोधातील आहेत. पाच गुन्हे कंत्राटी अथवा अनुदानित तत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांच्या विरोधात आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील इतर गुन्हेगारीचा आलेख मध्यंतरी खाली आला होता. लाच घेण्याचे प्रमाण मात्र काही कमी झालेले दिसत नाही.
च्नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा जमविल्याप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांत ३ लोकसेवकाांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात एक नायब तहसीलदार, एक वन विभागातील अधिकारी तर एका लोकप्रतिनिधीचा समावेश आहे. यंदा राज्यात प्रथमच नगरमध्ये अपसंपदाप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.अपसंपदेचे झाले तीन गुन्हे दाखल कुठलाही लोकसेवक शासकीय कामासंदर्भात लाच मागत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदार व्यक्तींना येणे शक्य नसेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ‘१०६४’ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्याची दखल घेऊन त्वरित कारवाई केली जाईल. तसेच सदर व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते.-हरिष खेडकर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
विभागातील दाखल गुन्हे च्नाशिक १६, अहमदनगर २३, नंदूरबार ६, जळगाव १८, धुळे ११ अशा एकूण ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ नगर जिल्ह्यातील लाचेच्या जाळ्यात सापडलेले कर्मचारी महसूल ६, पोलीस ५, पंचायत समिती १, वस्तू व सेवा कर १, पाटबंधारे १, भूमिअभिलेख १, विद्युत ३, आरोग्य २, शिक्षण खाते १, सहकार खाते १, वनखाते १, इतर खासगी व्यक्ती ५ अशा २७ जणांवर गुन्हे दाखल आहेत़