शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ जण पोलीसांत हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:24 PM

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी ४१ जण सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाले.

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी राष्ट्रवादीचे ४१ जण सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर झाले.माजी नगरसेवक निखिल वारे, आरिफ शेख आदींचा यामध्ये समावेश आहे. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे सेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलीसांनी अधीक्षक कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलीसांनी ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ४४ जणांना अटक केली असून, त्यांना जामीनही मिळालेला आहे. सोमवारी पोलीसांत हजर झालेल्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.यामध्ये नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, शेख अरिफ रफियोद्दिन, माजी नगरसेवक निखिल वारे, अविनाश घुले, वैभव ढाकणे, माजी उपमहापौर दीपक सूळ या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अटक झालेल्या कार्यकर्त्यांची नावे अशी- महेश जयसिंग बुचडे, केरप्पा रामचंद्र हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद, अशोक शिवाजी रोकडे, आवी शंकर बत्तीन, सागर बबन शिंदे, धीरज बबनराव उकिर्डे, समद वहाब खान, सुनील नारायण त्रिंबके, बबलू बन्सी सूर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश टेकनदास मेहतानी, सुहास साहेबराव शिरसाठ, सैय्यद मतीन खोजा, प्रकाश बाबुराव भागानगरे, कुलदीप सुदाम भिंगारदिवे, दत्तात्रय लहानु तापकिरे, बाबासाहेब भाऊसाहेब गाडळकर, बीर उर्फ दिलदार सिंग अजय सिंग शेख, फारूक अब्दुल अजीज रंगरेज, चंद्रकांत महादेव औशिकर, अरविंद नारायण शिंदे, सत्यजित नंदू ढवण, वैभव कैलास जाधव, राहुल सतीश शर्मा, मयूर कन्हैय्यालाल बांगरे, किरण बाबासाहेब पिसोरे, घनश्याम दत्तात्रय बोडखे, बाबासाहेब कारभारी जपकर, राजेंद्र रामदास ससे, वैभव चंद्रकांत दारुणकर, अक्षय सतीश डाके, मयूर दिलीप कुलथे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड