शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:47 AM

अहमदनगरमध्ये सोयाबीन, बाजरी, कपाशी, कांदा पिकांचे नुकसान

अहमदनगर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन, कांदा, बाजरी ही पिके भुईसपाट झाली. कांदा सडल्याने शेतकरी खचला. राज्य शासनाने प्रति हेक्टरला आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पिकांना एकाच एकरावरील पिकांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे सरकारची हेक्टरवरील पिकांसाठी (अडीच एकर) आठ हजार रुपये जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘लोकमत’ने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीगोंदा, नगर, पारनेर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांसाठी झालेल्या खर्चाची माहिती घेतली. राहुरी तालुक्यात सोयाबीनचे नुकसान झाले. नांगरणी (१६०० रुपये), हारू- रोटा वेटर (१२००)खुरपणी (५००), पेरणी (५००), खुरपणी (४०००), खुरपणी (१०००), खते (१२००) बियाणे (२१००), खळे (१५००), पाणी (२०००), शेतकरी श्रममूल्य (८०००) असा शेतकºयांनी सोयाबीन पिकावर एकरी २२ हजार ८०० रूपये खर्च केला. एकरी सोयाबीनचे एकरी उत्पादन ८ क्ंिवटल गृहीत धरले जाते़ सोयाबीनला ३५०० रूपये प्रतिक्ंिवटल भाव गृहीत धरला तर २८००० रूपये उत्पन्न मिळते़ शेतकऱ्यांना एकरी ५२०० रूपये नफा मिळाला असता. पारनेरचे शेतकरी कांतीलाल सोंडकर म्हणाले, कांदा लागवडीसाठी मजूर आळेफाटा, जुन्नरहून आणावे लागतात. दररोज दहा मजुरांना प्रत्येकी तीनशे रूपये रोजंदारी द्यावी लागते. तीन ते चार हजार खर्च खते, औषध फवारणीवर होतो. वीजबिलासह इतर मोठा खर्च आहे. लागवड ते काढणीपर्यंत दीड एकर क्षेत्रासाठीच ३२ हजार रूपये खर्च येतो.हेक्टरी २५ हजार रूपयांचा खर्च करून शेतकरी बाजरीचे उत्पादन घेतो. बियाणे- १,५००, पेरणी- २,५००, काढणी- ६ हजार, खते व पाणी, सोंगणी आणि नांगरट प्रत्येकी ५ हजार, असा हेक्टरी जवळपास २५ हजार रूपयांचा खर्च येतो, असे सारोळा बद्दी (ता. नगर) येथील शेतकरी तुकाराम लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी