शिर्डी : जळगाव व सातारा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या समितीने बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळचे तर नगर जिल्ह्यात शिर्डीचे पर्यटन केले. साई मंदिरात नगरमधील स्थानिक अधिकारीही समितीच्या दिमतीला होते.मनुष्यबळ विकास मंत्रालयात स्वतंत्रपणे केंद्रीय शालेय पोषण आहार समिती गठीत केली आहे. त्यातील आहारतज्ज्ञ भूपेंद्र कुमार, दिनेश प्रधान, राजेंद्र शंखपाल, स्वाती ध्रुव, श्रृती कांतावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल व मयुरी राणा यांची समिती राज्याच्या दौऱ्यावर आहे. शाळांना अचानक भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी करण्याची जबाबदारी समितीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील काही शाळाभेटी करून बुधवारी ही समिती सातारा जिल्ह्याकडे रवाना होणार होती. मात्र, सकाळी ते वेरूळला तर दुपारी शिर्डीला पर्यटनासाठी आले.साताºयाला जाताना शिर्डी गाव रस्त्यात येत नाही. मात्र, समितीने खास शिर्डीचा दौरा केला. समितीच्या दिमतीला जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी रमाकांत काटमोरे, जिल्हा शालेय पोषण आहार अधीक्षक कुुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी शिवबुंडे हे स्थानिक अधिकारी होते.>केंद्राचे पथक शिर्डीत आले होते. त्यांचा जळगाव व सातारा जिल्ह्याचा दौरा होता. मात्र, ते शिर्डीत येणार असल्याचा संदेश आल्याने मी स्वत: उपस्थित राहिलो. शिर्डीत शाळांची तपासणी केली नाही. मंदिरात दर्शन घेऊन पथक रवाना झाले. - रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी, जि.प. अहमदनगर.
शाळा तपासणीऐवजी वेरूळचे पर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:43 AM