अहमदनगर : नाताळसह सलग तीन दिवसांच्या सुट्या व नवीन वर्ष काही दिवसांवर आल्याने नगर- मनमाड रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामध्ये प्रवासी वाहनांचे प्रमाण मोठे आहे. सलग सुट्या असल्याने अनेकांनी धार्मिक, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे रस्त्यावर गेल्या तीन दिवसांपासून रहदारी वाढली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे. त्यातच मनमाड रस्त्यावर विळद ते देहरेदरम्यानचे खड्डे बुजवायचे राहिले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
----------------
माळीवाडा बसस्थानक परिसरात खड्डे
अहमदनगर : शहरातील महत्त्वाच्या असलेल्या माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटीचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. तसेच प्रवेशद्वार व बाहेर पडण्याच्या मार्गावर रिक्षा उभ्या असल्यानेही येथे वाहतूक कोंडी होते. काही रिक्षाचालक अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करतात. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.