कोपरगाव : लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष रामदास थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती प्रशिक्षक अनिकेत जाधव, मयूर जाधव आणि साक्षी सोनवणे यांनी गुरुवारी (दि. ९) विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेशमूर्ती पाहून प्रशिक्षकांनी समताच्या विद्यार्थ्यांचे कौतुक विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कला दिवसेंदिवस वाढणारी असून, कलेचा जीवनात वापर करावा, असे मार्गदर्शन करताना सांगितले. प्रशिक्षणात बनविलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त घरी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी विद्यार्थी घेऊन गेले. या प्रशिक्षणाला समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर अत्तार उपस्थित होते.