पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सन फार्मा कंपनीकडून सामाजिक दायित्व निधीतून सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृहाचे हस्तांतरण कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे होत्या. पाटील म्हणाले, सन फार्माकडून गावामध्ये फिरत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून, या सर्व सुविधांना ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. यापुढे कंपनी गावांसाठी आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय जपे यांनी केले. या कार्यक्रमास उपसरपंच भारती बनकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष झिने, सागर गुंड, बापू बेरड, इंद्रभान बारगळ, नीलेश छडीदार, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक सुनील पाडळे, रविकांत सुसे, सतीश राठोड, राजेंद्र ठाणगे, सविता मरभळ, भारजा गायकवाड, मंगल जावळे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अंबादास कदम यांनी केले.
पिंपळगाव माळवीच्या शाळेस स्वच्छतागृहाचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:20 AM