अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी (दि़ २५) जैसे थे (स्टेट्स को) ठेवण्याचा आदेश दिला, अशी माहिती अॅड़ राजेंद्र टेमकर यांनी ‘लोकमत’ला दिली़ या आदेशामुळे शिक्षकांच्या संभाव्य जिल्हांतर्गत बदल्या टळल्या आहेत़महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हाअंतर्गत बदली धोरण फक्त शिक्षक संवर्गासाठीच जाहीर केले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिक्षक राजेश जगताप व राजश्री राजेश जगताप व इतर २७ शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल करुन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जाचक अटी असल्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती़ या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुट्टीतील न्यायाधिश केक़े़ सोनवणे यांच्यासमोर सुनावणी झाली़ शिक्षकांच्या वतीने अॅड़ एस़ आऱ बारलिंगे, अॅड़ राजेंद्र टेमकर यांनी युक्तीवाद केला़ या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिश सोनवणे यांनी या याचिकांवर स्टेट्स को आदेश दिला असून त्यामुळे आंतरजिल्हा बदली नको असलेल्या शिक्षकांची बदली टळली आहे़राजश्री राजेश जगताप, राजेश जगताप, अंबादास गारुडकर, दत्ताभाऊ कुलट, भास्कर कराळे, संजय म्हस्के, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब कापसे, नारायण पिसे, शरद गिरवले, ईश्वर नागवडे, मच्छिंद्र लांडगे, नवनाथ वाळके, रोहिदास निमसे, राजाराम सरोदे, बबन शिंदे, शरद धलपे, संतोष साळे, राजू माने, बाळासाहेब डहाळे, महादेव नाईक, सोनवणे, महेश धामणे, अनिता शिंदे , रेखा पाटोळे, मनीषा डांगे आदींनी ही याचिका केली होती़
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तुर्तास टळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 2:35 PM