शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

सत्तरीतले वयोवृद्ध करताहेत पत्नीवर उपचार; दिवसभर काम, हॉस्पिटलमध्येच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 3:39 AM

कमलबाईंच्या दोन्ही किडन्या अडीच वर्षांपूर्वी निकामी झाल्या. तेव्हापासून त्या नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत.

सुदाम देशमुखअहमदनगर :  ‘तेल आलं संपत तरी, दुसऱ्यासाठी तेवतेय वात, काठीपेक्षा आतला आधार, सांगतो हातामधला हात’ या एका कवितेच्या ओळीची अनुभूती सध्या येथील आनंदऋषीजी रुग्णालयाच्या आवारात मिळते आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्याशी लढा देणाऱ्या ६५ वर्षांच्या आजीबाईंनी ‘आता घरी नकोच, जे काही जगायचे आहे, ते रुग्णालयातच जगायचे’ असा ठाम निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराला वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्या पतीनेही बळ दिले आहे. ही करुण कहाणी आहे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या बीड जिल्ह्यातील कमलबाई आणि साहेबराव बटुळे (रा. घोगस पारगाव, ता. शिरूर कासार) या वृद्ध दाम्पत्याची.

कमलबाईंच्या दोन्ही किडन्या अडीच वर्षांपूर्वी निकामी झाल्या. तेव्हापासून त्या नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांनी रुग्णालयातच आपला मुक्काम कायम केला आहे. कमलबाई यांना तीन मुले, सुना, नातवंडे आहेत. मात्र, त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम असून ते सर्व ऊसतोडणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात गेलेले आहेत. किडन्या निकामी झाल्याने त्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा डायलिसिस करावे लागते. मात्र, घोगस पारगाव ते अहमदनगर या लांबच्या अंतराचा प्रवास करणे आता अशक्य झाले आहे. त्यांना या जागेवरून उठणेही अवघड आहे.

मुले-नातेवाईक यांच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वत: वडापावच्या गाडीवर काम करतो आहे. अडीच वर्षांपासून रुग्णालयात घरून ये-जा करतो. आता पैसेही नाहीत आणि ताकदही राहिली नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कामही करणार आणि पत्नीला आधारही देणार आहे.- साहेबराव गणपत बटुळे

माझ्या खाण्या-पिण्याची, औषधांची व्यवस्था व्हावी म्हणून पती सत्तरीतही राबत आहेत. कोणालाच त्रास नको म्हणून इथेच राहते आहे. इथे रुग्णांच्या नातेवाईंकांचे दु:ख जाणून घेते, त्यांनाही धीर देते. - कमलबाई बटुळे