अकोले : आदिवासी संशोधन केंद्र पुण्यात नको. ते आदिवासी बहुल क्षेत्रातच हवे. त्यासाठी आपण मोर्चेबांधणी करणार आहोत. टिसचा सर्वे रिपोर्ट सरकारपर्यंत अद्याप आला नाही. मात्र धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षण धक्का लागता कामा नये, असे मत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.
अकोले येथे शनिवारी खाजगी कामासाठी झिरवाळ आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्ता व खुर्चीवर असताना निःपक्षपाती काम करताना कसरत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अस घडलं की राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या बारा जागांची नियुक्ती अडकून पडली आहे. निकष शोधले जात आहेत. आकस की आणखी काही राजकरण सांगता येत नाही ? असे झिरवाळ म्हणाले.
राज्यातील तीन पक्षांच्या भावकीत अंतर येणार नाही. सरकार पाच वर्षे टिकेल असेही त्यांनी स्पष्ट केले.