शासनाच्या नियमाचे पालन करत घरातील तरुण, बालक, वृद्ध सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंगलात जाऊन हिरडा गोळा करताना दिसतात. हिरडा गोळा करत असताना जंगलातील उन्हाळ्यात येणाऱ्या भाज्या गोळा करत आहेत. हिरडा हे औषधी फळ आहे. हिरड्याला प्रतिकिलो १६० ते २०० रुपये भाव असल्याने आदिवासी भागातील अबालवृद्ध हिरडा गोळा करत आहेत.
हे काम करत असताना संध्याकाळच्या भाजीसाठी जंगली भाज्या गोळा करतात. कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती, जंगली भाज्या, कंदमुळे, फळे, मधपोळे आहेत. जंगली भाज्या, कंदमुळे, फळे गोळा करत उपजीविका करतात, तर मध गोळा करून तो विकतात, परंतु हिरडा हे फळ बहुगुणी वनौषधी असल्याने चांगली किंमत मिळते.
कोरोना या महामारीला रोखण्यासाठी कोरोनापासून दूर राहण्यासाठी आदिवासी बांधवांनी जंगलाची वाट धरलेली दिसत आहे. कारण यामुळे कोरोनापासून संरक्षण होतेच, शिवाय परिवाराला आर्थिक मदत होते.